Ad will apear here
Next
‘सॅमसंग इंडिया’तर्फे केरळ पूरग्रस्तांसाठी मदत
नवी दिल्ली : केरळ येथे नुकत्याच आलेल्या पुराचा फटका बसलेल्या लोकांच्या मदतीसाठी सॅमसंग इंडियाने मदतीचा हात पुढे केला आहे. पूरग्रस्तांसाठी ग्राहक सेवा व्हॅन्स तैनात करण्यात आल्या असून, रिलिफ कॅम्पही उभारले जाणार आहेत. कंपनीची तीन केंद्रे आणि दोन कारखान्यातील कर्मचारीही केरळमधील लोकांसाठी योगदान देणार आहेत.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सॅमसंग इंडियातर्फे केरळ चीफ मिनिस्टर डिस्ट्रेस रिलिफ फंडाला (सीएमडीआरएफ) १.५ कोटी रुपयांचे योगदान दिले जाणार आहे; तसेच केरळ राज्यातील लोकांसाठी १० हजार बेडिंग सेट्स दान केले जाणार आहेत. सॅमसंगच्या तिरूवनंथपुरम येथील प्रतिनिधींतर्फे संबंधित रकमेचा धनादेश केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना दिला जाणार आहे.

राज्यातील रिलिफ कॅम्पद्वारे मोबाइल चार्जिंग स्टेशन्स तसेच खाद्यपदार्थ, दूध आणि औषधे ठेवण्यासाठी सॅमसंग रेफ्रिजरेटर्स, अन्न गरम करण्यासाठी सॅमसंग मायक्रोवेवस मनोरंजनासाठी सॅमसंग टीव्ही तसेच लोकांना आपले नातेवाईक आणि प्रियजनांशी संपर्क करता यावा म्हणून मोफत व्हॉइस व व्हिडिओ कॉलिंगची सुविधा देणारे सॅमसंग मोबाइल फोन्स पुरवले जाणार आहेत.

ग्रामीण भारतातील ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याच्या हेतूने २०१७ मध्ये राज्यात दाखल करण्यात आलेल्या सॅमसंग ग्राहक सेवा व्हॅन्सद्वारे राज्यातील सॅमसंग ग्राहकांना सेवा दिली जाणार आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZZNBS
Similar Posts
‘सॅमसंग’तर्फे डिजिटल कॅम्पेन नवी दिल्ली : सॅमसंग इंडियाने आपल्या डिजिटल व्हॉइट असिस्टंट बिक्सबीची क्षमता दर्शवण्यासाठी डिजिटल कॅम्पेन सादर केले आहे. एका हृदयस्पर्शी सादरीकरणाद्वारे बिक्सबीची क्षमता प्रेक्षकांसमोर येते आणि थेट हृदयाला भिडते. ही फिल्म मोटर न्यूरॉन डिसीज (एमएनडी)/एएलएस रुग्ण असलेल्या सोनलची (नाव बदललेले आहे) आहे, ज्यांनी
भारतातील सिनेमा थिएटरला नवा आयाम नवी दिल्ली : ग्राहकांना नाविन्यपूर्ण व सर्वोत्तम तंत्रज्ञान उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सॅमसंग इंडिया या देशातील सर्वात विश्वासार्ह कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने जगातील पहिला ऑनिक्स सिनेमा एलईडी स्क्रीन भारतात आणून सिनेमा पाहण्याच्या पद्धतीला नवा आयाम दिला आहे.
‘होंडा’तर्फे केरळ पूरग्रस्त ग्राहकांसाठी मोफत सेवा गुरूग्राम : पुराचा फटका बसलेल्या केरळला मदतीचा हात देण्यासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.ने आज राज्यातील सर्व होंडा टू व्हीलर ग्राहकांसाठी मोफत सर्व्हिस मोहीम व विशेष एक्स्चेंज लाभ देण्याची घोषणा केली आहे.
‘सॅमसंग’ नेमणार एक हजार अभियंते पुणे : सॅमसंग इंडिया आपल्या संशोधन आणि विकास केंद्रांसाठी २०१८मध्ये आयआयटी, आयआयएम, आयआयआयटी सारख्या सर्वोत्तम महाविद्यालयातून एक हजार अभियंते निवडणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language